रचना क्र. 8
गायीची आरती
श्री पेठेकाका
धेनू गंगामाई । आरति देवत्वाचे आई ॥ धृ ॥
पशूकुलातिल पावित्र्याचा तू आविष्कार ।
सात्त्विकता, करुणा, प्रेमाचा तू जणु अवतार ।
देवहि करिती वसतीसाठी तुझा अंगिकार ॥१॥
समजुत, शांती येवो माई अम्हा तुझ्यातील ।
भाव जाणवो अम्हा पामरा तव नयनांतील ।
तव सेवेने दीनजिवांना लाभो गोपाल ॥२॥
