रचना क्र. 54
सांडियेली लाज जाति अभिमान
श्री गोंदवलेकर महाराज · null
null
सांडियेली लाज जाति अभिमान ।
फिरे रानोरान तुजसाठी ॥धृ॥
तुजसाठी जीव झाला कासावीस ।
जैसी बाळकास आस लागे ॥१॥
तुझेसाठी माझा प्राण जाऊ पाहे ।
भेटी रघुराये देई मज ॥२॥
दास म्हणे दावी कोमल चरण ।
नाही तरी मरण देई देवा ॥३॥
