रचना क्र. 12
श्री अन्नपूर्णेची आरती
श्री पेठेकाका
आरती जय अन्नपूर्णे तुझिया पायाशी ।
अहर्निशी तू कृपाप्रसादे जग सांभाळीशी ॥ धृ ॥
जडचेतन जग चालविणे हा तुझा सहज धर्म।
फळे पालवी अन्नधान्य हे तुझे कृपा वर्म ॥
देउन, सेवू तुझ्या प्रसादा मनी धरू मर्म ।
करोत अवघे तृप्त प्राण, वैश्वानर नित कर्म ॥ १ ॥
जे जे बनवू अन्न चतुर्विध तुझ्या मंदिरी या ।
कृपा तुझी त्यामध्ये राहु दे सात्त्विकता द्याया ॥
अंतर शुद्ध करो सर्वांचे साधन वाढाया ।
दीन जीव होवोत मुक्त ही विनंति तव पाया ॥ २ ॥
