रचना क्र. 15
श्री शंकराची आरती
श्री पेठेकाका
शंकरा, जय शंकरा ॥ धृ ॥
शांत वसशी निबिड रानी ।
मौनमुनि कैलास बनुनी ।
हिंस्रता, विष तू पचवुनी ।
तारीशी अभयंकरा ॥१॥
नृत्य तव हे विश्व सारे ।
मृत्युतांडव हेहि तू रे ।
भक्त भोळे दीन तव रे ।
उद्धरी करुणाकरा ॥२॥
रचना क्र. 15
श्री पेठेकाका
शंकरा, जय शंकरा ॥ धृ ॥
शांत वसशी निबिड रानी ।
मौनमुनि कैलास बनुनी ।
हिंस्रता, विष तू पचवुनी ।
तारीशी अभयंकरा ॥१॥
नृत्य तव हे विश्व सारे ।
मृत्युतांडव हेहि तू रे ।
भक्त भोळे दीन तव रे ।
उद्धरी करुणाकरा ॥२॥