रचना क्र. 1
तुझे रूप ध्यानी
श्री गोंदवलेकर महाराज
तुझे रूप ध्यानी राहो माझे मनी ।
रामनाम वाणी वदो सदा ॥धृ॥
तुझे चरणासाठी संतांचा हा रज ।
करुनि ठेवी मज रघुनाथा ॥१॥
मज नको स्वर्ग इंद्रही भुवन ।
कीर्ती आणि धन नको मज ॥२॥
नको मज साधन मोठे ब्रह्मज्ञान ।
राहो समाधान सर्वकाळ ॥३॥
तुझे नामी गोडी लावावी आवडी ।
दास म्हणे जोडी द्यावी मज ॥४॥
