रचना क्र. 19
श्री दत्तगुरूंची आरती
श्री पेठेकाका
जय देवा जय देवा जय श्री गुरुदत्ता ।
करुणामय,जय निश्चल,निर्मल अवधूता ॥धृ॥
आसक्तीच्या त्यागे जिंकिति संसारी ।
अवस्थात्रयत्रिगुणांचे स्वामित्व करी ।
नाथ समर्थ महानुभाव वारकरी ।
धर्मपंथातीत दत्त कृपा करी ॥१॥
जे जे ‘दत्त’ आम्हा परमेशे दिधले ।
उद्धाराचे त्यातच गुह्य असे दडले ।
अपुल्या अवतारे ते सकळ कळो आले ।
दत्तप्रभूंनी असंख्य दीन उद्धरिले ॥२॥
