रचना क्र. 50
साद घालितो सत्संगा
श्री पेठेकाका
साद घालितो सत्संगा
उद्धरी भवभयभंगा, तारी रे ॥धृ॥
थोर भाग्य माझे, नष्ट भ्रमाचे ओझे ।
बेगडी असंगाचे, फोलपण दावीशी गा ॥१॥
संग मागे मन, संग मागे तन ।
तुझ्या संगे समाधान, खरे अनुभवले गा ॥२॥
कैसे ते कळेना, मन हे सोडीना ।
सदा तूचि ध्याना, अता कसा येशी गा ॥३॥
तुज प्रगटाया पाही, पानेफुले काही घेई ।
जनावचनातुनि येई, परि भेट देई गा ॥४॥
सदा उठोनिया रोज, वाटे आळवावे तुज ।
दीन म्हणे मज, सदा कसा भेटशी गा ॥५॥
