रचना क्र. 82
तुमचे नामसंकीर्तन
श्री एकनाथ महाराज
तुमचे नामसंकीर्तन ।
हेचि माझे संध्यास्नान ॥१॥
तुमचे पायांचा साक्षेप ।
हाचि माझा कालक्षेप ॥२॥
तुमचे पायांचे वंदन ।
हेचि माझे अनुष्ठान ॥३॥
तुमचे पायापाशी निद्रा ।
हेचि माझी प्रेममुद्रा ॥४॥
एका जनार्दनाकार ।
ब्रह्मरूप हा संसार ॥५॥
