रचना क्र. 85
हरि मज कसा करिल भवपार
श्री विष्णुदास महाराज
हरि मज कसा करिल भवपार ॥धृ॥
भवसंसारी भ्रमलो, श्रमलो,
फिरलो दारोदार ॥१॥
मी दुष्कृतनिधि, मी दुर्बुद्धी,
मी अपराधि अपार ॥२॥
निराधार मी, जगति कुणाचा,
नाही मज आधार ॥३॥
धीर धरवेना, मज तरवेना,
भवसागर अनिवार ॥४॥
विष्णुदास म्हणे हरिभक्तांप्रति,
विनवितो वारंवार ॥५॥
