रचना क्र. 97
ब्रह्मचैतन्यांचा आधार
श्री पेठेकाका
ब्रह्मचैतन्यांचा आधार ।
एक निरंतर, आम्हा ॥धृ॥
मित्र पुत्र बाप माय
जो तो पाही अपुली सोय ।
प्रसंगात कोणी न ये
जवळ केले गुरूराये ।
गुरुराव सदा आधार, आम्हा.. ॥१॥
वाटे पैसा कामी येई
घरदार हात देई ।
उपयोगा न ये पाही
गुरुरायावीण काही ।
गुरुराव देई आधार, आम्हा.. ॥२॥
वाटे बुद्धिज्ञानकर्म
देव भेटवील धर्म ।
कसे ठरे फोल तेही
गुरुवीण सारे काही ।
दीन म्हणे एक आधार, आम्हा..॥३॥
