रचना क्र. 162
नाभीत कस्तुरी असता जवळी
श्री स्वामी स्वरूपानंद
नाभीत कस्तुरी असता जवळी ।
हिंडे रानोमाळी मृग जैसा ॥१॥
विषयांचा छंद घेवोनिया वाया ।
आनंद सेवाया धावतसे ॥२॥
अंतरी सन्निध राहे श्री गोविंद ।
परि मतिमंद पाहेचिना ॥३॥
स्वामी म्हणे मोहे झालासे आंधळा ।
स्वानंद सोहळा भोगीचिना ॥४॥
