रचना क्र. 167
करुनी विनवणी पायी ठेवितो माथा
श्री तुकोबा
करुनी विनवणी पायी ठेवितो माथा ।
परिसावी विनंती माझी पंढरीनाथा ॥१॥
अखंडित असावे ऐसे वाटते पायी ।
साहोनि संकोच ठाव थोडासा देई ॥२॥
असो नसो भाव आलो तुझिया ठाया ।
कृपादृष्टी पाहे मजकडे पंढरीराया ॥३॥
तुका म्हणे आम्ही तुझी वेडीवाकुडी ।
नामे भवपाश हाते अपुल्या तोडी ॥४॥
