रचना क्र. 181
कृपाळू सज्जन तुम्ही संतजन
श्री तुकोबा
कृपाळू सज्जन तुम्ही संतजन ।
हेचि कृपादान तुमचे मज ॥धृ॥
आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा ।
कीव माझी सांगा काकुळती ॥१॥
अनाथ अपराधी पतित आगळा ।
परि पायावेगळा नका करू ॥२॥
तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी ।
मग मज हरी उपेक्षीना ॥३॥
