रचना क्र. 183
गणपती मनोहरमूर्ती
श्री पेठेकाका
गणपती मनोहरमूर्ती ।
करिती मंगल नित जगती ॥धृ॥
भव्य दर्शनी, विशाल श्रवणी ।
सिद्ध जे सदा, भक्तरक्षणी ।
नयन कृपा बरसती,
ज्यांचे, नयन कृपा बरसती ॥१॥
काळ-स्थिती-गुण त्रिविध व्यापिती ।
परी सदा ते अतीत असती ।
हाकेला धावती,
संकटी, हाकेला धावती ॥२॥
प्रश्न जगी हे दुर्बुद्धीचे ।
गणेश दैवत शुद्धबुद्धिचे ।
प्रकाश जे दाविती,
बुद्धिला, प्रकाश जे दाविती ॥३॥
दीनभक्त शरणागत चरणी ।
एक भाव या श्री गजाननी ।
भव तरुनी नेती,
नामे, भव तरुनी नेती ॥४॥
