रचना क्र. 186
हेचि देवाचे दर्शन
श्री तुकोबा
हेचि देवाचे दर्शन ।
सदा राहे समाधान ॥धृ॥
मान अपमान गोवे ।
अवघे गुंडुनी ठेवावे ॥१॥
शांतीची वसती ।
तेथे खुंटे काळगती ॥२॥
आली ऊर्मी साहे ।
तुका म्हणे थोडे आहे ॥३॥
© 2026 साधननंदादीप — डॉ. सुहास पेठे. सर्व हक्क राखीव.
रचना क्र. 186
श्री तुकोबा
हेचि देवाचे दर्शन ।
सदा राहे समाधान ॥धृ॥
मान अपमान गोवे ।
अवघे गुंडुनी ठेवावे ॥१॥
शांतीची वसती ।
तेथे खुंटे काळगती ॥२॥
आली ऊर्मी साहे ।
तुका म्हणे थोडे आहे ॥३॥