रचना क्र. 224
सत्य सुखासाठी नसे कोठे सोय
श्री विश्वनाथ महाराज
सत्य सुखासाठी नसे कोठे सोय ।
धरा आधी पाय गुरूचेच ॥धृ॥
गुरू सांगे तैसे वागावे आपण ।
होई लीन मन घडे सेवा ॥१॥
गुरू देई नाम जपावे अंतरी ।
पापासी संहारी वाढे पुण्य ॥२॥
म्हणे विश्वनाथ पुण्य कर्म होता ।
येई सुख हाता गुरुकृपे ॥३॥
