रचना क्र. 226
साधकाने नित्य सावध असावे
श्री विश्वनाथ महाराज
साधकाने नित्य सावध असावे ।
मना बोधवावे भक्तिज्ञान ॥धृ॥
सत्कर्माची गोडी मनासी लावावी ।
विचारे करावी वृत्ती लीन ॥१॥
पदोपदी सत्य विचार करावा ।
आधार हा घ्यावा संतांचा तो ॥२॥
म्हणे विश्वनाथ प्रेमाने अंतरी ।
जपता श्रीहरी गुरुकृपा ॥३॥
