रचना क्र. 229
हेतु मनी धरिला
श्री पेठेकाका
हेतु मनी धरिला । देवा, तव चरणी ठेविला ॥धृ॥
उद्धाराचा, उपासनेचा । सत्संगाचा, निजबोधाचा ।
मौनजपाचा, अभ्यासाचा । हेतु मनी धरिला ॥१॥
नको जगाच्या मागे जाणे । भ्रमात जगणे पुन्हा जन्मणे ।
येथुन आता सावध जगणे । हेतु मनी धरिला ॥२॥
निर्धाराचे अम्हा बळ चढो । सेवाजीवन मना आवडो ।
साधकसंगे साधन वाढो । हेतु मनी धरिला ॥३॥
संत अम्हांपरि देही आले । पुढे पहाता देवचि झाले ।
जाणुन घेऊ कसे जहाले । हेतु मनी धरिला ॥४॥
संतमार्ग हा कळून घेणे । मनापासुनी सदा वर्तणे ।
दीन म्हणे तव कृपा मिळविणे । हेतु मनी धरिला ॥५॥
