रचना क्र. 259
हरीवीण दैवत, नाही पै अनुचित्ती
श्री निवृत्तीनाथ
हरीवीण दैवत, नाही पै अनुचित्ती ।
अखंड श्रीपती, नाम वाचे ॥१॥
रामकृष्ण मूर्ती, या जपा आवृत्ती ।
नित्य नामे तृप्ती, जाली आम्हा ॥२॥
नामाचेनि स्मरणे, नित्य पै सुखात ।
दुजियाची मात, नेणो आम्ही ॥३॥
निवृत्ती जपतू , अखंड नामावळी ।
हृदयकमळी, केशीराज ॥४॥
