रचना क्र. 262
निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ
श्री निवृत्तीनाथ
निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ ।
तोडी मायाजाळ संकीर्तने ॥१॥
भवजळ काया पंचतत्त्व माया ।
भजन उपाया पंढरिरावो ॥२॥
तारक पंढरी प्रसिद्ध भीमातीरी ।
ब्रीदे चराचरी बोले वेदू ॥३॥
माया मोहजाळ ममता निखळ ।
सेविता सकळ होय हरी ॥४॥
