रचना क्र. 275
दत्त दिगंबर भजो रे
श्री विश्वनाथ महाराज
दत्त दिगंबर भजो रे ।
दत्त दिगंबर भजो रे ॥धृ॥
दत्त दिगंबर स्वरूप ज्याचे ।
मोक्षपद सुख घेऽरेऽ ॥१॥ दत..
आत्मसुख हरी रूप डोळा ।
नाथऽ नंगे भेट देऽ रेऽऽ ॥२॥ दत्त..
तूऽच ब्रह्मा, तूच विष्णू ।
तूच महेऽश्वरा रे ॥३॥ दत्त..
तूऽच माऽया, माय विश्व ।
जगद्गुरू तूच रे ऽऽ ॥४॥ दत्त..
दास बिदुड्या सांगे जगाला ।
नाथ नंगा मुखी भजो रे ऽ ॥५॥ दत्त..
