रचना क्र. 11
नाम हरीचे गोड । सखया
श्री रामदास स्वामी
नाम हरीचे गोड । सखया ॥धृ॥
घेउनि रुचि त्या नामरसाची ।
भवबेडी हे तोड ॥१॥
बैसुनिया गृही वेळ नको गमू ।
भलती बडबड सोड ॥२॥
रामदास म्हणे आवरुनि मन हे ।
सद्गुरुचरणा जोड ॥३॥
रचना क्र. 11
श्री रामदास स्वामी
नाम हरीचे गोड । सखया ॥धृ॥
घेउनि रुचि त्या नामरसाची ।
भवबेडी हे तोड ॥१॥
बैसुनिया गृही वेळ नको गमू ।
भलती बडबड सोड ॥२॥
रामदास म्हणे आवरुनि मन हे ।
सद्गुरुचरणा जोड ॥३॥