रचना क्र. 339
रूप पहाता लोचनी
श्री ज्ञानोबा
रूप पहाता लोचनी ।
सुख झाले वो साजणी ॥१॥
तो हा विठ्ठल बरवा ।
तो हा माधव बरवा ॥२॥
बहुत सुकृताची जोडी ।
म्हणूनि विठ्ठली आवडी ॥३॥
सर्व सुखाचे आगर ।
बाप रखुमादेवीवर ॥४॥
© 2026 साधननंदादीप — डॉ. सुहास पेठे. सर्व हक्क राखीव.
रचना क्र. 339
श्री ज्ञानोबा
रूप पहाता लोचनी ।
सुख झाले वो साजणी ॥१॥
तो हा विठ्ठल बरवा ।
तो हा माधव बरवा ॥२॥
बहुत सुकृताची जोडी ।
म्हणूनि विठ्ठली आवडी ॥३॥
सर्व सुखाचे आगर ।
बाप रखुमादेवीवर ॥४॥