रचना क्र. 353
ज्याची खरी सेवा
श्री तुकोबा
ज्याची खरी सेवा ।
त्याच्या भय काय जीवा ॥धृ॥
करिता स्वामीसवे वाद ।
अधिक अधिक आनंद ॥१॥
असावा तो धर्म ।
मग साहो जाते वर्म ॥२॥
वदे वाग्देवी ।
तुका विठ्ठली गौरवी ॥३॥
© 2026 साधननंदादीप — डॉ. सुहास पेठे. सर्व हक्क राखीव.
रचना क्र. 353
श्री तुकोबा
ज्याची खरी सेवा ।
त्याच्या भय काय जीवा ॥धृ॥
करिता स्वामीसवे वाद ।
अधिक अधिक आनंद ॥१॥
असावा तो धर्म ।
मग साहो जाते वर्म ॥२॥
वदे वाग्देवी ।
तुका विठ्ठली गौरवी ॥३॥