रचना क्र. 372
हेचि देवासी मागत
श्री नामदेव महाराज
हेचि देवासी मागत ।
चरणसेवा अखंडित ॥धृ॥
वास द्यावा पंढरीचा ।
सदा संग हरिदासांचा ॥१॥
धन्य हो का भलते याती ।
परी मी न चुके हरिभक्ती ॥२॥
नामा म्हणे कमळापती ।
हेचि द्यावे पुढती पुढती ॥३॥
© 2026 साधननंदादीप — डॉ. सुहास पेठे. सर्व हक्क राखीव.
रचना क्र. 372
श्री नामदेव महाराज
हेचि देवासी मागत ।
चरणसेवा अखंडित ॥धृ॥
वास द्यावा पंढरीचा ।
सदा संग हरिदासांचा ॥१॥
धन्य हो का भलते याती ।
परी मी न चुके हरिभक्ती ॥२॥
नामा म्हणे कमळापती ।
हेचि द्यावे पुढती पुढती ॥३॥