रचना क्र. 382
कशी मग देव करिल दया
श्री रंगनाथ स्वामी
कशी मग देव करिल दया ॥धृ॥
शुष्कचि वदसी नाम हरीचे,
त्यागिसि ना काया ॥१॥
अनन्यभावे शरणचि म्हणवुनि,
भोगिसि या विषया ॥२॥
निष्कामाचे भजन सकामी,
कर्म न सांग जया ॥३॥
तत्त्वमसीचा बोध न घेशी,
भवभय हाराया ॥४॥
निजानंद निजरंगि रंगूनी,
मन ठेवी पाया ॥५॥
