रचना क्र. 417
हिरा ठेविता ऐरणी
श्री तुकोबा
हिरा ठेविता ऐरणी ।
वाचे मारिता जो घणी ॥१॥
तोचि मोल पावे खरा ।
करणीचा होय चुरा ॥२॥
मोहरा होय तोचि अंगे ।
सूत न जळे ज्याचे संगे ॥३॥
तुका म्हणे तोचि संत ।
सोसी जगाचे आघात ॥४॥
© 2026 साधननंदादीप — डॉ. सुहास पेठे. सर्व हक्क राखीव.
रचना क्र. 417
श्री तुकोबा
हिरा ठेविता ऐरणी ।
वाचे मारिता जो घणी ॥१॥
तोचि मोल पावे खरा ।
करणीचा होय चुरा ॥२॥
मोहरा होय तोचि अंगे ।
सूत न जळे ज्याचे संगे ॥३॥
तुका म्हणे तोचि संत ।
सोसी जगाचे आघात ॥४॥