रचना क्र. 422
चुकलिया ताळा
श्री तुकोबा
चुकलिया ताळा ।
वाती घालुनि बैसे डोळां ॥१॥
तैसे जागे करी चित्ता ।
काही आपुलिया हिता ॥२॥
निक्षेपिले धन ।
तेथे गुंतलेसे मन ॥३॥
नाशिवंतासाठी ।
तुका म्हणे करिसी आटी ॥४॥
© 2026 साधननंदादीप — डॉ. सुहास पेठे. सर्व हक्क राखीव.
रचना क्र. 422
श्री तुकोबा
चुकलिया ताळा ।
वाती घालुनि बैसे डोळां ॥१॥
तैसे जागे करी चित्ता ।
काही आपुलिया हिता ॥२॥
निक्षेपिले धन ।
तेथे गुंतलेसे मन ॥३॥
नाशिवंतासाठी ।
तुका म्हणे करिसी आटी ॥४॥