रचना क्र. 431
घडो घडो संतसेवा
श्री विश्वनाथ महाराज
घडो घडो संतसेवा ।
एवढी भीक वाढा देवा ॥धृ॥
नाही मागण्या दुसरे ।
संतांपायी सुख खरे ॥१॥
संतांसंगे लाभ खरा ।
भेटे दीनाचा सोयरा ॥२॥
विश्वनाथा संत थोर ।
तेच देवाचे अवतार ॥३॥
© 2026 साधननंदादीप — डॉ. सुहास पेठे. सर्व हक्क राखीव.
रचना क्र. 431
श्री विश्वनाथ महाराज
घडो घडो संतसेवा ।
एवढी भीक वाढा देवा ॥धृ॥
नाही मागण्या दुसरे ।
संतांपायी सुख खरे ॥१॥
संतांसंगे लाभ खरा ।
भेटे दीनाचा सोयरा ॥२॥
विश्वनाथा संत थोर ।
तेच देवाचे अवतार ॥३॥