रचना क्र. 474
रामभक्त साध्वी अंबिकाबाई यांची आरती
श्री पेठेकाका
ओवाळू अंबिके जय जय रामहृदयवासी ॥
विठ्ठलास साकडे घालुनी भक्तिपंथ धरिसी ॥धृ॥
मुंबईत नियतीने नेले ।
संसारा थाटुनिया दिधले ।
दोन लेकरा पदरी दिधले ।
पंचविशित परि पती हरपले ।
आघाता सोशी ॥१॥ ओवाळू अंबिके...
उभय कुळांचा आश्रय नुरला ।
पंढरिचा आधार गाठला ।
लेकुरांसवे प्रार्थित त्याला ।
सगुण घेउनी सवे विठ्ठला ।
आलिस गावासी ॥२॥ ओवाळू अंबिके...
विठ्ठल घाली रामपाउली ।
देवधर्मशाळाही दिधली ।
नाम घेत कर्तव्ये केली ।
काया सेवेमधे झिजविली ।
अखंड उपवासी ॥३॥ ओवाळू अंबिके...
वाचुन घेउन प्रवचन प्रतिदिन ।
दीनमनी बोधासी घटवुन ।
भक्तिवारसा अंती देउन ।
ध्यास मनी रामाचा घेउन ।
रामरूप होसी ॥४॥ ओवाळू अंबिके...
