रचना क्र. 482
श्री तुकामाई आरती
श्री पेठेकाका
ओवाळू, जय जय तुकामाई || धृ ||
अंशावतार दत्तांचे |
प्रेम विठ्ठलभक्तीचे |
शिष्य चिन्मयानंदांचे |
झाली साकार पुण्याई ||१||
अवडंबरावरी प्रहार |
पारखती लहानथोर |
जीव शरणांगतावर |
गरीबाची भाकर खाई ||२||
ब्रह्मचैतन्य शिष्य थोर |
पूर्ण कृपा तयांवर |
दिला नामाचा अधिकार |
दीनभक्तां ठेवी पायी ||३||
