रचना क्र. 486
श्री निंबरगी महाराज आरती
श्री पेठेकाका
जय जय जय गुरुलिंगजंगमा, काडसिद्धप्रेमा |
निंबरगींना ओवाळूया निर्गुणसुखधामा ||धृ||
काडसिद्धआज्ञेने छत्तिस वर्षे तप केले |
हरिहर अनुभव आत्मारामी तादात्म्ये आले |
कर्मकांड अवडंबर टाकुनि खरे पुण्य केले |
भ्रमितांना जागवुनी शाश्वत आत्मज्ञान दिले ||१||
साधुबुवा, उमदीकर अगणित शिष्य सिद्ध केले |
गणपतिवदनी ‘पंचसमासी’ सार तुम्ही दिधले |
अंबुराव, गुरुदेवांकरवी नाम जगी नेले |
कितीक दीनजिवांना जन्मोजन्मी सावरिले ||२||
