रचना क्र. 498
नाम होय ज्याचा प्राण
श्री पेठेकाका
नाम होय ज्याचा प्राण |
विश्व करी त्याचे रक्षण ||धृ||
देह देवासाठी देता |
देव वाहे त्याची चिंता ||१||
देहबुद्धी करी दान |
देव देई त्यासी मान ||२||
सत्यासत्य मिथ्या भास |
जाणे त्याला नुरे त्रास ||३||
नामातीता उरते स्मरण |
दीन जीव नारायण ||४||
