रचना क्र. 513
न दिसे देव असुनी डोळा (चाल -२)
श्री पेठेकाका
न दिसे देव असुनी डोळा ।
लागे अंजन वेळोवेळा ।। १।।
तुळसी माळ देही धरिली ।
देहबुद्धी नाही गेली ।।२।।
उदंड सद्भक्तीचे श्रवण ।
होवो कृपा राहण्या भान ।। ३।।
दीन म्हणे झाले, गेले ।
कृपे सार्थक होवो उरले ।। ४।।
