रचना क्र. 515
शब्द अर्थावीण फोल
श्री पेठेकाका
शब्द अर्थावीण फोल |
आचरणाने अर्था मोल || १ ||
कोण सावध कशासी म्हणे |
ज्याचे त्याचे जाणुन घेणे || २ ||
नच करिता चिंतन मनन |
अवघे मंत्र शब्दज्ञान || ३ ||
बोल शास्त्र केले गोळा |
आचाराविण पोकळ सोहळा || ४ ||
दीन म्हणे गवसो गाभा |
सतचित् आनंदाची प्रभा || ५ ||
