रचना क्र. 34
श्री गजानन महाराजांची आरती
श्री पेठेकाका · null
null
शेगावीच्या गजानना, जय गजानना ।
घेण्या आरति या सदना ॥धृ॥
अपूर्व तुम्ही योगिजन ।
स्वानंदी नित रममाण ।
देहा धरिता अवतरुन ।
भक्तांसाठी तळमळुन ।
हित करण्यासी कळवळुन ॥१॥
अन्नजलाचे महिमान ।
गेलो होतो विसरून ।
धनमदपैशाला भुलुन ।
गेलो देवा विसरून ।
आम्हा दिधले जाणवुन ॥२॥
दांभिक, स्वार्थी खडबडुन ।
जागे केले शिकवून ।
निजसामर्थ्या दाखवुन ।
सर्वांभूती देवपण ।
भक्तीचे लाभे वळण ॥३॥
कली पुन्हा ये भयंकर ।
भूल घालितो जगावर ।
देवाचा पाडी विसर ।
दीनजनांना अभयवर ।
देण्या या हो घरोघर ॥४॥
