रचना क्र. 37
श्री स्वामी समर्थांची आरती
श्री पेठेकाका · null
null
जय जय स्वामी समर्थ तुम्हा, ओवाळू दत्ता ।
अक्कलकोटनिवासी गुरुवर, प्रसन्न व्हा भक्ता ॥धृ॥
वटवृक्षाची छाया भक्ता,
अनन्यजीवा निर्भय करिता ।
स्वार्थ, अहंता उरू न देता,
हित जपण्याकरिता ॥१॥
भक्त मनीचे नश्वर हरता,
शाश्वत दीना अपार देता ।
अतर्क्य सत्तेने आम्हाला ,
तारुनि न्या आता ॥२॥
