रचना क्र. 40
श्री निसर्गदत्त महाराजांची आरती
श्री पेठेकाका · null
null
श्री अवधूता निसर्गदत्ता ओवाळूया रे ॥धृ॥
सिद्ध पंथ रामेश्वर सद्गुरु ।
स्वरुपबोधे शोध करिति सुरु ।
पैल पोचले जीवनतारु ।
स्वरूप होशी रे ॥१॥
कुठे भेद ना, ना अवडंबर ।
स्वरूप अपुले शोधा सत्वर ।
तळमळ, कृति हा मार्ग खरोखर ।
दावि प्रकाशा रे ॥२॥
कितीक देशिविदेशी आले ।
भ्रमलेले जन जागृत झाले ।
दीनजिवांचे भाग्य उदेले ।
तव संवादे रे ॥३॥
