रचना क्र. 42
श्रद्धेची आरती
श्री पेठेकाका · null
null
श्रद्धेची आरती करूया निर्गुणसगुणाची ।
जाणीव देई जी सर्वांतील शुद्ध स्वरूपाची ॥धृ॥
मनबुद्धीला जाग देतसे ।
त्यांचे त्यांना स्थान देतसे ।
मर्यादांचे भान देतसे ।
ओळख देई आनंदाच्या विशाल जगताची ॥१॥
कसे, का, कुठे आपण आलो ।
मायेमध्ये रमून गेेलो ।
दिव्यत्वाचा हेतु विसरलो ।
स्मरण देउनी ध्येय गाठण्या दिल्या प्रेरणेची ॥२॥
सार्थक होण्या नरजन्माचे ।
देत जी दिशा,साह्य शक्तिचे ।
दीनजिवांना छत्र कृपेचे ।
श्रद्धा ती टिकुदेत, प्रार्थना, हीच आर्ततेची ॥३॥
