रचना क्र. 49
देवांची शेजारती
श्री पेठेकाका · null
null
निर्गुण प्रेमळ सगुण ब्रह्म ते, आले अमुच्या घरी ।
घ्या शेजारती सगुण देव हो,भावमंचकावरी ॥ अमुच्या भावमंचकावरी ॥धृ॥
दिक्कालातील दिव्य पसारा ।
अतर्क्य जगती नित्य चालला ।
विश्वासाठी श्रमला देवा, निद्रा घ्या अंतरी ॥१॥ अमुच्या ...
अपराधी वा दोषगुणी वा ।
तारुनि नेले तुम्हीच देवा ।
क्षमा करूनी अता विसावा, घ्यावा दीनांतरी ॥२॥ अमुच्या ...
