रचना क्र. 59
चंद्राची आरती
श्री पेठेकाका · null
null
ओवाळू चंद्रमा नभमय शीतल सुखप्रेमा |
भगवंताची तूच विभूती, जग जन मनधामा ||धृ||
तू आकाशी कलेकलेने |
स्नेह जागविशि सहजपणाने |
शुद्धपक्षव्रत धरणाऱ्यांना नित होशी पूर्णिमा ||१||
कृष्णपक्षिही वाटिशि मार्दव |
अवसेला सूर्यार्पण वैभव |
रिक्त होउनी दाविशि दीना त्यागाची सीमा ||२||
