रचना क्र. 66
श्री भाऊसाहेब उमदीकर महाराज यांची आरती
श्री पेठेकाका · null
null
जय जय भाऊराया,
ओवाळू, जय जय भाऊराया ।
जय उमदीशा, नेमाधीशा,
जय जय भाऊराया ओवाळू...॥ धृ ॥
पुण्याईला फळ येवोनी ।
साधुबुवांचे दर्शन होउनी ।
निंबरगींची कृपा घडोनी ।
नामानुभवे भेदिशि माया ॥ जय जय... ॥ १॥
निंदा साहुनि जन बोधियला ।
खरा देव दीनांस दाविला ।
आचरणाचा पथ प्रदर्शिला ।
उद्धरण्या जन झिजविशि काया ॥ जय जय...॥२॥
