रचना क्र. 68
श्री गणोरे बाबांची आरती
श्री पेठेकाका · null
null
प्रेमनिधी श्री संत गणोरे बाबांना आरती ।
जय जय बाबांना आरती ।। धृ ।।
देशकारणी देह झिजविला ।
परकी सत्तेसवे झुंजला ।
‘त्यागी’ म्हणुनी कीर्ति पावला ।
स्वातंत्र्याचा सूर्य उगवता, देवमार्ग धरिती ।। १ ।। जय जय बाबांना...
सीतामाई पतीपरायण ।
श्रमा, साधना साथ विलक्षण ।
बाबा झाले देवा अर्पण ।
माघ शुद्ध दशमीला तुकया, वरदहस्त ठेविती ।। २ ।। जय जय बाबांना...
ओंकाराचे रहस्य हाती ।
साक्षात्कारी बाबा देती ।
भुकूम मठ प्रेरणा निर्मिती ।
हरीरामविठ्ठल या नामे, दीनजिवां तारिती ।। ३ ।। जय जय बाबांना...
