रचना क्र. 525
शंक चक्र गदा पद्म
श्री पेठेकाका · null
null
शंख चक्र गदा पद्म।
तोचि माझा पुरुषोत्तम ।।१।।
चाप बाण धर्माचरण।
तोचि माझा राम जाण ।।२।।
गोरगरीबा विसावा।
माझा विठ्ठल जाणावा ।।३।।
हितापोटी झिजती माता।
त्याचि माझ्या कुलदेवता ।।४।।
हीण जाळी, शुद्ध भाव।
तोचि माझा महादेव ।।५।।
दीन म्हणे ओळखावा।
रूपे मायिक देखावा ।।६।।
