रचना क्र. 2
श्री समर्थ रामदास स्वामी
श्री पेठेकाका · null
null
नमन समर्था रामदासा ।
वैराग्यभक्तीच्या महापुरुषा ।
चेतविसी राष्ट्रपुरुषा ।
रामोपासना बळे ॥११॥
सुमुहूर्ती सावध होऊन ।
स्वजन स्वसुख त्यागून ।
आत्माराम करुनी प्रसन्न ।
घेतलासे तपोबळे ॥१२॥
अमुचे प्रपंचदास्य मोडो ।
आम्हा रामदास्य घडो ।
हनुमंत कुळस्वामी आवडो ।
इहपर स्वहित साधो ॥१३॥
