रचना क्र. 23
श्री मामासाहेब दांडेकर
श्री पेठेकाका
नमन श्री मामांना ।
धन्य दांडेकर कुलोत्पन्ना ।
जोगबुवांच्या शिष्यांत गणना ।
अग्रभागी आपुली ॥७४॥
लौकिक विद्यासंपन्न ।
अमोलिक केले अध्यापन ।
ब्रह्मचारी वर्गास भूषण ।
प्राचार्यही झाला ॥७५॥
ज्ञानेश्वरी सार्थ केली ।
प्रत्यक्ष जगून सांगितली ।
वारकरी परंपरा सांभाळिली ।
सत्कार्य वाटे प्रेरक ॥७६॥
