रचना क्र. 37
अव्यक्त संतनमन
श्री पेठेकाका
आणि तयां सर्वांना नमन ।
जे प्रतिमारूपे नसून ।
सूक्ष्म रूप धारण करून ।
असंख्य संत येथे ॥११६॥
सत्कार्याचे कौतुक धरून ।
पदावलीचे प्रेम वाटून ।
साधकांचे पाहून अंत:करण ।
रमले संत येथे ॥११७॥
त्यांनी सुखेनैव आनंदे रहावे ।
साधकांवरी कृपाछत्र धरावे ।
जीव उत्तम गतीस न्यावे ।
येथील अवघे ही विनवणी ॥११८॥
॥ सब संतन की जय ॥
