रचना क्र. 1
श्री समर्थ रामदास स्वामी
श्री पेठेकाका
जागे होउनि त्यागुनी स्वसुख जे, सुमुहूर्त साधूनिया |
आत्माराम प्रसन्न घेति करुनि, दासांसी बोधावया ||
करिती जागृत राष्ट्र, व्यक्ति सकळा, कल्याण साधावया |
त्या श्री सद्गुरू रामदासचरणा, अत्त्यादरे वंदुया ||
