रचना क्र. 34
का रे शिणलासी वाउगा
श्री तुकोबा · null
null
का रे शिणलासी वाउगा ।
न भजता पांडुरंगा ॥१॥
तीळ जाळिले तांदुळ ।
कामक्रोध तैसेचि खळ ॥२॥
मानदंभासाठी ।
केली अक्षरांची आटी ॥३॥
तप करूनी तीर्थाटन ।
वाढविला अभिमान ॥४॥
वाटिले ते धन ।
केली अहंता जतन ॥५॥
तुका म्हणे चुकले वर्म ।
केला अवघाचि अधर्म ॥६॥
