रचना क्र. 36
आपण नरकी बुडोनि वडील
श्री निरंजन रघुनाथ · null
null
आपण नरकी बुडोनि वडील ।
बाळासी पुढील सांगताती ॥१॥
करावा संसार चांगला थाटून ।
लोकी भलेपण मेळवावे ॥२॥
नकळे आपण केला संसार ।
काय हितकर जाला बहू ॥३॥
निरंजन म्हणे रांडेच्या गाढवा ।
काय हितठेवा बोललासी ॥४॥
